
राजधानी दिल्लीतील यमुनेच्या विषारी पाण्याच्या मुद्यावरुन राजकारण शिगेला पोचले आहे. यमुनेच्या पात्रात हरियानाकडून सोडल्या जाणाऱ्या पाण्यात वाढत चाललेल्या अमोनियाच्या प्रमाणाकडे लक्ष वेधण्यासाठी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले. आतिशी पाठोपाठ हरियानाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनीही निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पाठोपाठ काँग्रेसनेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.