
नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या स्मारकावरून राजकीय वाद उफाळून आला आहे. निगमबोध येथे अंत्यसंस्कार करणे हा दिवंगत नेत्याचा अपमान असल्याचा प्रहार काँग्रेसने केला आहे. तर, केंद्र सरकारने स्मारक उभारण्याची तयारी दर्शविली असताना काँग्रेसकडून मात्र राजकारण केले जात आहे, असा प्रत्यारोप भाजपने केला आहे.