West Bengal : राजकीय हिंसाचाराने पुन्हा प.बंगाल हादरले
Political Violence : पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात राजकीय हिंसाचाराने पुन्हा डोकं वर काढलं असून, तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा गोळीबारात मृत्यू झाला. अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
कोलकता : पश्चिम बंगाल पुन्हा एकदा राजकीय हिंसाचारामुळे हादरले आहे. येथील माल्डा जिल्ह्यामध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारामध्ये तृणमूल काँग्रेसचा एका कार्यकर्ता मरण पावला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.