कोलकत्यात दिवाळीत प्रदूषणात घट

पीटीआय
Monday, 16 November 2020

गेल्या वर्षी शहरातील विविध भागात ‘एक्यूआय’ ३०० ते ५०० या दरम्यान होता. यंदा शहरात तुरळक प्रमाणात फटाके उडाल्याने हवेची गुणवत्ता फारशी खालावली नाही, असे ते म्हणाले. 

कोलकता - दिवाळी आणि कालीमाता पूजेच्या दिवशी शनिवारी सायंकाळी कोलकत्यामधील हवेची गुणवत्ता गेल्या वर्षापेक्षा चांगली होती, अशी माहिती पश्‍चिम बंगाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (डब्ल्यूबीपीसीबी) अधिकाऱ्याने रविवारी दिली. याचे कारण म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत काल फटाके उडविण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तर कोलकत्यामधील रवींद्र भारती विद्यापीठातील नियंत्रण कक्षाने काल सायंकाळी उशिरा नोंदविलेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २२६ (२.५ पीएम) होता. २०१९ मध्ये हा निर्देशांक ७०० पर्यंत गेला होता. गेल्या वर्षी शहरातील विविध भागात ‘एक्यूआय’ ३०० ते ५०० या दरम्यान होता. यंदा शहरात तुरळक प्रमाणात फटाके उडाल्याने हवेची गुणवत्ता फारशी खालावली नाही, असे ते म्हणाले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे पश्‍चिम बंगालमध्ये सणांच्या काळातील काली पूजा, दिवाळी, छट आणि अन्य पूजाविधीला सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या वापरावर कलकत्ता उच्च न्यायालयाने बंदीचा आदेश  गेल्या आठवड्यात दिला होता. 

गेल्‍या वर्षी केवळ ज्या फटाक्यांचा आवाज ९० डेसिबलपेक्षा जास्त आहे अशा फटाक्यांवर बंदी घातली होती. प्रकाशाचे फटाके उडविण्यास बंदी नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution reduction in Kolkata on Diwali

Tags
टॉपिकस
Topic Tags: