Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
Supreme Court : बनावट कागदपत्रांद्वारे नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. "त्या ना मारेकरी आहेत ना दहशतवादी," अशी स्पष्ट टिपणी न्यायालयाने केली.
नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ‘बनावटगिरी करत भारतीय नागरी सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप असलेल्या पूजा यांनी कुणाचीही हत्या केलेली नाही.