जबरदस्तीच्या लोकसंख्या नियंत्रणाचे भीषण परिणाम होतील - एस जयशंकर

भारतीय लोकसंख्येचा वाढीचा दर घसरत आहे
जबरदस्तीच्या लोकसंख्या नियंत्रणाचे भीषण परिणाम होतील - एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि समृद्धीमुळे भारताची लोकसंख्या कमी होत आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमात त्यांनी 'द इंडिया वे: स्ट्रॅटेजीज फॉर एन अनसर्टेन वर्ल्ड' या त्यांच्या पुस्तकाचा गुजराती अनुवादाचं प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी भारताच्या लोकसंख्येबाबत बोलताना म्हणाले की, "भारतीय लोकसंख्येचा वाढीचा दर घसरत आहे. याचे कारण शिक्षण, सामाजिक जाणीव आणि समृद्धी आहे. काळाच्या ओघात कुटुंबाचा आकार लहान होत गेला."

"जबरदस्तीने लोकसंख्या नियंत्रणाचे अत्यंत धोकादायक परिणाम होऊ शकतात, त्यामुळे लैंगिक असमतोल निर्माण होऊ शकतो," असंही जयशंकर म्हणाले. स्वातंत्र्यानंतर, भारताने आपल्या लोकसंख्येच्या संरचनेत तीव्र बदल पाहिले आहेत. हे लोकसंख्येच्या विस्फोटातून गेले आहे (जनगणना 1951) आणि एकूण प्रजनन दरात घट देखील दिसून आली आहे.

UN वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स (WPP), 2022 ने भाकीत केले आहे की, भारत 2023 पर्यंत 140 दशलक्ष लोकसंख्येसह चीनला मागे टाकून सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल. सध्या भारताची लोकसंख्या जगाच्या 17.5 टक्के आहे. भारत 2030 पर्यंत 150 कोटी आणि 2050 पर्यंत 166 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे.

जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बदललेल्या भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, "काही राजकीय कारणांमुळे आम्हाला इस्रायलशी संबंध वाढवण्यापासून स्वत:ला मर्यादित करावे लागले. इस्रायलला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान होते असंही ते म्हणलेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com