
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय संकटाशी संबंधित शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या खटल्यांच्या सुनावणीसाठी उद्याची यादी दिली जाऊ शकते, सुप्रीम कोर्टानं याबाबत मंगळवारी संकेत दिले आहेत. CM एकनाथ शिंदे गटाचे वरिष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर उद्या नक्कीच काहीतरी होईल असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. (Possibility of urgent hearing in SC tomorrow on Shiv Sena dilemma CJI signal)
तातडीच्या सुनावणीसाठी या प्रकरणाचा उल्लेख करताना अॅड. कौल म्हणाले, हे प्रकरण सुप्रीम कोर्टानं पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवलं होतं आणि 'खरी' शिवसेना निश्चित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगासमोरची कार्यवाही रखडली आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खंडपीठाला माहिती देताना कौल म्हणाले, या समस्येचं तातडीनं निराकरण करण्याची गरज आहे.
शिवसेनेच्या पेचप्रसंगावर अद्याप सुनावणी नाही
सुप्रीम कोर्टानं मागच्या सुनावणीत म्हटलं होतं की, या प्रकरणाची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी घटनापीठाद्वारे केली जाईल, परंतु हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी आलेलं नाही. एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्ष म्हणून ओळखण्यासाठी आणि धनुष्यबाण चिन्ह वाटपासाठी दाखल केलेल्या अर्जावर 25 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटानं एकनाथ शिंदे गटाच्या 'खरी' शिवसेना म्हणून ओळखल्याच्या दाव्यावर निवडणूक आयोगासमोर कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.
मोठ्या घटनापीठाकडं पाठवलं प्रकरण
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटलं होतं की, महाराष्ट्राच्या राजकीय संकटात गुंतलेल्या काही मुद्द्यांवर विचार करण्यासाठी मोठ्या घटनापीठाची आवश्यकता असू शकते. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या सदस्यांविरुद्ध जारी करण्यात आलेल्या नव्या अपात्रतेच्या नोटिसांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी केली होती शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.