गोव्यात आता होणार चक्क न्यूड पार्टी...

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये दावा करण्यात आला आहे की, पार्टीमध्ये 15 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश आहे. या पार्टीत हवं तसं सेक्स करता येईल असेही पोस्टरवर नमूद केले आहे. पोस्टरवर पार्टी कधी आणि नेमकं कोणत्या ठिकाणी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही.

पणजी : मौजमजेचे आकर्षण असलेल्या गोव्यात आता चक्क न्यूड पार्टी होणार आहे. या पार्टीचे पोस्टर्स सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन पोस्टर्समुळे खळबळ उडाली आहे. उत्तर गोव्यातील मोरजिम समुद्र किनारी ही न्यूड पार्टी होणार असल्याचे पोस्टर्सवरून दिसत आहे. पोलिसांनी याची चौकशी सुरू केली असून राज्यात असे प्रकार होऊ देणार नाही. गोव्यात अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांचा शोध लावला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये दावा करण्यात आला आहे की, पार्टीमध्ये 15 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश आहे. या पार्टीत हवं तसं सेक्स करता येईल असेही पोस्टरवर नमूद केले आहे. पोस्टरवर पार्टी कधी आणि नेमकं कोणत्या ठिकाणी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या पोस्टरवर देण्यात आलेल्या नंबरवर फोनही सातत्याने व्यस्त लागत आहे. त्यामुळे खरंच अशा प्रकारची पार्टी होणार आहे की फक्त एक अफवा पसरवली याचा शोध घेण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poster of Nude Party In North Goa Surfaces On Social Media