esakal | Video : अंतराळवीर उतरला चंद्रावर अन् बाजूने गेली रिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

Banglore

बंगळूरमधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नागरिक अंतराळवीराच्या वेशात रस्त्यावरून स्लो मोशनमध्ये चालताना दिसत आहे.

Video : अंतराळवीर उतरला चंद्रावर अन् बाजूने गेली रिक्षा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर : बंगळूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क अंतराळवीराच्या वेशात एका नागरिकाने रस्त्यावरून चालण्याचा व्हिडिओ केला आहे.

बंगळूरमधील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नागरिक अंतराळवीराच्या वेशात रस्त्यावरून स्लो मोशनमध्ये चालताना दिसत आहे. याचे शुटींगही भन्नाट केले असून, जणू काही चंद्रावर माणूस चालत असल्याचे जाणवत आहे. मात्र, नंतर हा चंद्र नसून, बंगळूरमधील रस्त्यावरील खड्डे असल्याचे दिसत आहे. 

loading image
go to top