

Prajwal Revanna Jail Raid: 90 Obscene Videos Found on Mobile Phone
esakal
कर्नाटकातील हसनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. बंगळूरमधील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रेवण्णाच्या कोठडीवर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत एक मोबाईल फोन, चार्जर, पेन ड्राईव्ह आणि पॉकेट नोटबुक जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या स्मार्टफोनच्या तपासणीत तब्बल ८० ते ९० अश्लील व्हिडिओ आढळल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका सहायक अधीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.