Rahul Gandhi
esakal
बेळगाव : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हातात कोऱ्या कागदाचे संविधान आहे. अशा संविधानाचे पुस्तक घेऊन ते फिरत आहेत. मात्र, संविधानात काय आहे, याची त्यांना माहिती नाही. देशात काँग्रेसने संविधानात सर्वाधिक दुरुस्ती केली आहे, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी केली.