
नवी दिल्ली : इथेनॉल मिश्रणाचे सध्या असलेले प्रमाण वाढविण्यासाठी आणि त्याच्या दरवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी (ता. ३) येथे दिले. साखर उद्योग क्षेत्रात बारा महिने रोजगारनिर्मिती करण्यासाठी ‘बिझनेस मॉडेल’ तयार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.