गोवा राजकीय प्रयोगासाठीची लॅब नाही; भाजपचा आप-TMCवर निशाणा

Pramod sawant
Pramod sawant

गोवा: गोव्यासहित (Goa) पाच राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय वातावरण तापत आहे. राजकीय वक्तव्यांसोबतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. गोव्यामध्ये देखील सध्या हेच वातावरण पहायला मिळत आहे. गोव्यात सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेसशिवाय (Congress) आम आदमी पार्टी (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) असे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष देखील मैदानात उतरुन शड्डू ठोकू पाहत आहेत. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा सत्ता स्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. (Goa Assembly Election 2022)

Pramod sawant
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

राज्यामध्ये आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन नव्या पक्षांची हा घुसू पाहण्याचा प्रयत्न विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना रुचलेला दिसत नाहीये. या दोन पक्षांनी काही प्रमाणात उभं केलेलं आव्हान देखील भाजपसमोर असणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, राज्यातील मतदार या बाहेरच्या पक्षांना घुसखोरी करण्याची परवानगी देणार नाहीत. हे असे पक्ष यावेत आणि येत्या विधानसभेमध्ये गोव्याचा वापर आपल्या राजकीय प्रयोगासाठी लॅबप्रमाणे (Goa as lab for political experiments) करावा, या सगळ्या प्रकाराला गोवेकर नक्कीच नाकारतील, असं त्यांनी म्हटलंय. प्रमोद सावंत कोथांबी गावात एका जनसभेला संबोधित करत होते.

Pramod sawant
ना मास्क... ना सोशल डिस्टन्सिंग! शहांच्या रॅलीत नियमांची पायमल्ली

सावंत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावरही आरोप लावले आहेत. त्यांनी म्हटलंय की, या बाहेरुन आलेल्या पक्षांशी समझौता करत या पक्षाने आपल्या मूल्यांसोबत प्रतारणा केली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आगामी निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षासोबत युती केली आहे. तृणमूल काँग्रेसप्रमाणेच गोव्यात घर करु पाहणारा आम आदमी पक्षही सध्या राज्यात हालचाली करताना दिसून येतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com