पाटणा : बिहार लोकसेवा आयोगाची (बीपीएससी) परीक्षा रद्द करण्याची मागणी करत मागील चार दिवसांपासून पाटण्यात उपोषणाला बसलेले राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना आज पोलिसांनी अटक करत न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मंजूर होऊन ते तुरुंगातून बाहेर आले.