प्रशांत किशोरांनी काँग्रेसची ऑफर नाकारली; ''नेतृत्वाचा प्रश्न आधी सोडवा''

काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्या पार पडल्या होत्या.
Prashant Kishore
Prashant Kishoreesakal

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होणार नाहीये, अशी माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ट्वीट करत दिली आहे. काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्या पार पडल्या होत्या. यामध्ये किशोर यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काही गोष्टींचे सादरीकरणही केले होते. त्यानंतर किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळातून व्यक्त केली जात होती. मात्र, आता सुरजेवाल यांच्या ट्वीटनंतर यावर पूर्ण विराम लागला असून, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Prashant Kishor Declines Offer To Join Congress)

याबाबत प्रशांत किशोर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की. मी EAG चा भाग म्हणून काँग्रेस (Congress) पक्षात सामील होण्यासाठी आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर नाकारली आहे. तसेच परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. (Prashant Kishor Tweet)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, किशोर यांना पक्षामध्ये सहभागी करून घेण्यावरून नेत्यांचे वेगवेगळे मतं होेते. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून, भारतीय राजकीय कृती समितीने तेलंगणा राष्ट्र समितीसोबत केलेली युतीवरून प्रशांत किशोर आणि काँग्रेसमधील चर्चा निष्फळ बोलणी तुटण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्यासाठी आणि 2024 साठीच्या निवडणुकांसाठी किशोर यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या 13 सदस्यीय समितीने त्यांचा अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर केला होता. तसेच यासंदर्भात सोमवारी काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली होती. यामध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सहभागी करण्याच्या बाजूने होते, मात्र दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी याबाबत नकाराच्या बाजूने होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com