प्रशांत किशोर यांनी मानले राहुल आणि प्रियंका गांधी यांचे आभार, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

प्रशांत किशोर हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. दरम्यान, 2014 लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे भाजपला गेल्या तीन दशकातील सर्वांत मोठा विजय मिळवता आला होता. 

पाटणा : पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असलेले तसेच जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्य़क्ष प्रशांत किशोर यांनी राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि नागरिक संशोधन पुस्तिका (NRC) या कायद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे य दोघांचे धन्यवाद मानले आहेत. तसेच त्यांनी हे दोन्ही कायदे बिहार राज्यात लागू होणार नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - कारमध्येच रंगली वाढदिवसाची पार्टी; पोलिसांनी उतरविली 'झिंग'

प्रशांत किशोर यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये ते म्हणतात या दोन्ही कायद्यांबाबत काॅंग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत मी त्यांना धन्यवाद देतो. या कायद्यांना राहूल गांधी व प्रियंका गांधी यांनी केलेल्या विरोधाच्या भूमिकेची मी कौतुक करतो व त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज मोदी सरकार बॅकफूटवर गेले आहे. ते पुढे म्हणतात की, मी बिहारच्या जनतेला आश्वस्त करतो की हे दोन्ही कायदे बिहारमध्ये लागू होणार नाहीत.     

कोण आहेत प्रशांत किशोर- प्रशांत किशोर हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. दरम्यान, 2014 लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या रणनीतीमुळे भाजपला गेल्या तीन दशकातील सर्वांत मोठा विजय मिळवता आला. या विजयामुळे प्रशांत किशोर चर्चेत आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असलेल्या प्रशांत किशोर यांची अनेक पक्षांनी निवडणुकीवेळी मदत घेतली आहे. २०१७मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रशांत किशोर यांना रणनीतीची जबाबदारी दिली होती. पण यात काँग्रेसचा पराभव झाला आणि प्रशांत किशोर यांना अपयश आले. आत्ता झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांची मदत घेतली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant kishor thanks rahul gandhi and priyanka gandhi