Jagdeep Dhankhar: प्रस्ताविकेत बदल शक्य नाही; धनकड यांचे प्रतिपादन, आणीबाणीतील घटनांना उजाळा
Kochi News: राज्यघटनेची प्रस्तावना ही मुलांसाठी पालकांसारखी आहे. तिच्यात कोणताही बदल कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही, असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी कोची येथे व्यक्त केले. आणीबाणीदरम्यान करण्यात आलेला बदल ही दु:खद घटना होती, असेही ते म्हणाले.
कोची : ‘‘मुलांसाठी पालकांचे जे स्थान आहे ते स्थान राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे असून त्यात कोणी कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी ती कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलली जाऊ शकत नाही,’’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी सोमवारी केले.