
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रेदमसची भविष्यवाणी सर्वाधिक चर्चेत आहे. यात 2020 पेक्षा 2021 जास्त भयंकर असेल असं म्हटलं आहे.
नवी दिल्ली - गेल्या वर्षभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना जग आता नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आतुर झाले आहे. नव्या वर्षात कोरोनावर मात करून सगळं काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून 2020 आणि 2021 बाबतच्या काही भविष्यवाणी चर्चेत आल्या आहेत. यामध्ये बाबा वेंगा आणि नॉस्ट्रेदमसची भविष्यवाणी सर्वाधिक चर्चेत आहे. यात 2020 पेक्षा 2021 जास्त भयंकर असेल असं म्हटलं आहे. आता 2010 मध्ये एका शाळेत शिकणाऱ्या मुलाने 2020 बद्दल केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
2020 च्या सुरुवातीलाच प्रिन्स हॅरी आणि मेघन हे शाही परिवारातून बाहेर पडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला मोठी आग लागली. या आगीतून सावरत असतानाच दुसऱ्या बाजूला जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. यानंतर कोरोनाचा कहर इतका वाढला की जगच एका जागी थांबल्यासारखं झालं. यामुळे रोजच्या दैनंदिन जीवनावर प्रचंड परिणाम झाला. आता एका विद्यार्थ्याने 2020 बद्दल 10 वर्ष आधी केलेली भविष्यवाणी व्हायरल होत आहे. खरंतर त्यानं जे काही म्हटलं होतं त्याच्या विरुद्ध सगळं घडलं आहे.
Two very rough predictions from 5th graders in 2010.
(Via @ian_mac5) pic.twitter.com/3A2wMWN08s
— Freezing Cold Takes (@OldTakesExposed) December 24, 2020
केविन सिंह असं मुलाचं नावल असून सध्या त्याची दहा वर्षापूर्वीची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. त्यात म्हटलं होतं की, प्रत्येकजण शांततेत जगेल. 2020 मध्ये प्रत्येक आजाराचा उपचार केला जाईल. पण केविनच्या या भविष्यवाणीच्या अगदी उलट सगळं घडलं आहे.
I never seen a jinx work so well https://t.co/RoLmjl382M
— BossLogic (@Bosslogic) December 26, 2020
एका पुस्तकात त्यानं म्हटलं होतं की, 2020 साठी माझी अशी भविष्यवाणी आहे की, प्रत्येकजण शांततेत राहील. प्रत्येक आजार ठीक होईल. शाळेच्या एका वार्षिक अंकातील फोटो सध्या सोशल मीडियाव व्हायरल होत आहे.
हे वाचा - 2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?
ट्विटरवर लाखो लोकांनी हे शेअर केलं असून अनेकांनी त्याची खिल्लीही उडवली आहे. एकीकडे काही भविष्यवेत्त्यांची खरी ठरलेली भविष्यवाणी शेअर केली जात असताना या खोट्या ठरलेल्या भविष्यवाणीची चर्चा जोरात होत आहे.