भाजपला रोखण्यासाठी ममता बॅनर्जी अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये, विरोधकांची बांधणार मोट

देशातील २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र, १५ जूनला दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित
mamata banerjee latest political News
mamata banerjee latest political News
Summary

देशातील २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र, १५ जूनला दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित

राज्यसभेची द्वैवार्षिक निवडणूक पार पडताच विरोधी पक्षांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. पुढील महिन्यात निवडणुका पार पडणार असून या दृष्टिकोनातून तयारी सुरु आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी एकजूटीसाठी हालचालींनी वेग धरला आहे. देशातील २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांनी पत्र लिहून १५ जूनला दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. (mamata banerjee latest political News)

ममता यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची १५ जूनला दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे लालूप्रसाद यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह विविध विरोधी पक्षांच्या २२ नेते उपस्थित असणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

mamata banerjee latest political News
'गद्दारी'च्या आरोपामुळे देवेंद्र भुयार नाराज; शरद पवारांशी करणार चर्चा

या बैठकीत होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार देण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना ममतांनी या बैठकीसाठी निमंत्रित केलेले नाही. देशात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. अशा स्थितीत लोकशाहीला पुन्हा वाचवण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन ममता यांनी या पत्रात केले आहे.

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जूनला काढण्यात येणार असून, २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान होऊन, २१ जुलै रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडे ४८.९ टक्के मते असून, बहुमतासाठी आणखी १३ हजार मतांची आवश्यकता आहे.

mamata banerjee latest political News
'पांडुरंगापेक्षा मोठा मोदींचा फोटो'; पंतप्रधानांचा देहू दौरा वादात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com