संविधान दिन: 'या' कार्यक्रमांना असणार राष्ट्रपती-पंतप्रधानांची हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ibta's Bahujan Mandal has organized a district level online competition on the occasion of Constitution Day

संविधान दिन: 'या' कार्यक्रमांना असणार राष्ट्रपती-पंतप्रधानांची हजेरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधान स्विकारण्यात आलं होतं. त्यामुळे हा दिवस संविधान स्विकृती दिन म्हणून साजरा केला जातो. येत्या 26 नोव्हेंबर रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान दिनानिमित्त आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

हेही वाचा: समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा! मलिकांचा बॉम्ब

रामनाथ कोविंद हे संविधानाची प्रास्ताविका वाचणार आहेत. संविधानसभेतील वादविवाद आणि चर्चांचे डिजीटल व्हर्जनचे अनावरण देखील ते करणार आहेत. संविधानाची कॅलिग्राफ केलेली प्रत तसेच तिची अद्ययावत आवृत्ती ज्यामध्ये आजपर्यंतच्या सर्व सुधारणांचा समावेश असेल, अशा प्रतीचेही अनावरण करणार आहेत. तसेच एक ऑनलाईन क्विझ देखील या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुप्रीम कोर्टाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय संविधान दिनाच्या सोहळ्याचं उद्घाटन करणार आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश तसेच ज्येष्ठ न्यायाधीश आणि भारताचे सॉलिसिटर जनरल हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांसमोर पंतप्रधान मोदी संबोधन करणार आहेत.

हेही वाचा: मोदी सरकार कुठे-कुठे फेल? भाजपच्या खासदारानेच दिले रिपोर्ट कार्ड

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सांगितलंय की, संविधानाच्या प्रास्ताविकेचे ऑनलाइन वाचन 23 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. हा कार्यक्रम लोकसभेचे सचिवालय आणि स्पिकर ओम बिर्ला यांच्याद्वारे आयोजित करण्यात येणार आहेत.

loading image
go to top