
नवी दिल्ली : विकसित भारत साकारण्यासाठी राज्यघटनेच्या आदर्शांचे पाठबळ मिळत राहावे यासाठी सेवा, सुशासन, समृद्धी आणि स्वाभिमान ही चतुःसूत्री प्रशासनाच्या केंद्रस्थानी ठेवली आहे अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारसाठी राज्यघटना सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोरील अभिभाषणात केले.