सोन्याच्या दरात मोठी वाढ; नवे दर...

वृत्तसंस्था
Tuesday, 7 April 2020

लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प

- सणासुदीतही व्यवहार नाहीच

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी शेअर मार्केटच्या निर्देशांकांत घसरण झाली होती. त्यानंतर आता भारतात सोन्याचे दरात वाढ झाली आहे. प्रतितोळा (१० ग्रॅम) तब्बल दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याने सर्वांत उच्चांकी पातळी गाठली आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. मात्र, आता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाल्याने आता सोने प्रतितोळा 45,724 रुपयांवर गेले आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो ४३,३४५ पर्यंत गेले आहेत.

लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर लगाम लावता यावा, यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सध्या सर्वच व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यानंतर आता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 

Gold Weekly Price Forecast - Gold Markets Showing Signs of Resiliency

सणासुदीतही व्यवहार नाहीच

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी-विक्री केली जाते. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने ऐन सणासुदीतही सोन्याची खरेदी-विक्री झाली नाही. 

प्रत्यक्ष खरेदी-विक्रीला अद्याप विलंबच

सोने-चांदीच्या दरात वाढ झाली असली तरीदेखील प्रत्यक्ष खरेदी-विक्री कधी होणार हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या व्यवहाराला अद्यापही विलंबच लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Gold and Silver increased New Rate 45724 Per 10 Grams