esakal | सोन्याच्या दरात मोठी घसरण; नवे दर...
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याच्या दरात मोठी घसरण; नवे दर...

- शेअर बाजारामध्येही घसरण

सोन्याच्या दरात मोठी घसरण; नवे दर...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याचा अनेक देशांना फटका बसत आहे. यामुळे शेअर बाजार कोसळला आहे. त्यानंतर आता शेअर बाजार कोसळल्यानंतर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सोन्याचा दर गुरुवारी 128 रुपयांनी स्वस्त होऊन त्याचा भाव 44 हजार 490 रुपयांवर आला होता. मात्र, आता यामध्ये 2600 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता नवा दर 41,556 झाला आहे. तर चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. चांदी 302 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदी 46 हजार 868 रुपये प्रतिकिलो झाली.

महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण; कर्नाटकात देशातील पहिला बळी

दरम्यान, सोने 516 रुपयांनी बुधवारी स्वस्त झाले होते. दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 44490 रुपये झाला होता. मात्र, आता यामध्ये कपात करण्यात आली आहे. 

loading image