esakal | ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि पिनरायी विजयन यांचं पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन

बोलून बातमी शोधा

Modi_mamata_stalin_vijayan
ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि पिनरायी विजयन यांचं पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, द्रमकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन आणि एलडीएफचे नेते पिनरायी विजयन या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. यापुढे केंद्र आणि राज्ये मिळून एकत्र काम करु, असं आश्वासनही यावेळी मोदींना या तिन्ही नेत्यांना दिलं.

मोदी म्हणाले, "ममता दीदींचं पश्चिम बंगालमधील विजयासाठी अभिनंदन. केंद्राकडून पश्चिम बंगालच्या जनतेसाठी शक्य ती सर्व मदत सुरु राहिल. इथल्या जनतेचं इच्छा-आकांक्षा आणि कोविडच्या काळातही केंद्र तुमच्या सोबत असेल." आमच्या पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पश्चिम बंगालच्या माझ्या बंधु-भगिनींचे आभार मानतो. नुकतचं काही काळासाठी भाजपचं जनतेकडं दुर्लक्ष झालं होतं पण आता पक्षाचं अधिक लक्ष राहिलं आणि आम्ही कायमच आपल्या सेवेत हजर राहू. त्याचबरोबर मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं देखील आभार मानतो ज्यांनी निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतले, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

दरम्यान, केरळच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचे आणि त्यांच्या एलडीएफ पक्षाचं देखील अभिनंदन केलं. आपण यापुढेही विविध विषयांवर सोबत काम करु तसेच कोरोनाच्या जागतीक महामारीशी लढा देऊ, असं आश्वासनं यावेळी मोदींनी त्यांना दिलं.

त्याचबरोबर तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचे देखील अभिनंदन केले आहे. देशाच्या प्रगतीसाठी, स्थानिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण भविष्यात एकत्र काम करु. तसेच कोरोनाला पराभूत करु, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.