डिजिटल हेल्थ मिशन सुरु, PM मोदींनी केला शुभारंभ

डिजिटल हेल्थ मिशन सुरु, PM मोदींनी केला शुभारंभ

Pradhan Mantri Digital Health Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन (PM-DHM) योजनेचा शुभारंभ झाला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी आरोग्यमंत्रीही उपस्थित होते. डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट, 2020 रोजी लाल किल्ल्यावरुन केली होती. सध्या, सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम-डीएचएम प्रायोगिक टप्प्यात सुरु होणार आहे. पीएम-डीएचएम डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या विस्तृत श्रेणीच्या माध्यमातून सुलभ, सर्वसमावेशक, कार्यक्षम, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करेल.

प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन (PM-DHM) योजने अंतर्गत नागरिकांना आधार प्रमाणे एक डिजीटल हेल्थ आयडी पुरविली जाईल. या आयडीमध्ये त्या व्यक्तीच्या आरोग्यसंदर्भातील सगळे रेकॉर्ड्स उपलब्ध असतील. हा हेल्थ आयडी प्रत्येक नागरिकासाठी एकमेव असा असेल. आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या आधारावर त्याची निर्मिती करण्यात येईल. त्याशिवाय स्मार्टफोनधारकांना हे कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन (PM-DHM) योजनेचा शुभारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पाहूयात काय म्हणाले पंतप्रधान....

देशाच्या आरोग्य व्यवस्थेत हे क्रांतीकारी पाऊल आहे.

या योजनेमुळे आरोग्यसेवा अधिक सुलभ होणार आहे. हेल्थ आयडीच्या आधारावर देशात कुठेही उपचार करता येतील.

रुग्णांची भाषा, आजार आणि इतर निकषांनुसार रुग्णालय शोधण्यास मदत होईल

हेल्थ कार्डमध्ये तुमची सर्व आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरुपात असेल. शिवाय उपचारानंतर याच कार्डमध्ये तुमचे रिपोर्ट जोडले जातील.

या कार्डच्या नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक, आधारक्रमांक मिळेल. त्यानंतर 13 अंकी युनिक आयडी मिळेल.

या योजनाचा डॉक्टारांनाही फायदा होणार

गरिब आणि मध्यम वर्गीयांना या योजनाचा मोठा लाभ होईल

भारतीयांची माहिती डिजिटल स्वरुपात संकलित होणार

देशातील नागरिकांना युनिक असा डिजिटल आयडी दिला जाणार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य सेवकांचे आभार मानले

आरोग्य सेतु अॅपमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली.

देशभरात सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे.

आतापर्यंत 90 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. यामध्ये कोविन अॅपची महत्वाची भूमिका आहे. कोरोना काळात टेलिमेडिसिननेही सर्वांची मदत केली.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त जणांचा उपचार मोफत करण्यात आला आहे.

याआधी अनेक गरिब रुग्णालयात जात नव्हते, मात्र आयुष्यमान भारत आल्यापासून सर्वजण उपचार घेत आहेत.

प्रधानमंत्री डिजीटल हेल्थ मिशनचा उद्देश भारताची आरोग्य सेवा प्रणाली अधिक चांगली करणे हा आहे. याद्वारे हेल्थकेअरच्या गरजांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणे शक्य होईल. तसेच अशा सेवा देणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचणे देखील सोपे होणार आहे. हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे केंद्र म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com