PM मोदींनी व्यंकय्या नायडूंची केली आचार्य विनोबा भावेंशी तुलना!

PM मोदींनी तीन पानी पत्र लिहितं नायडू यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
VinobaBhave_naidu
VinobaBhave_naidu

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची तुलना थेट थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांच्याशी तुलना केली आहे. नायडू यांचा कार्यकाळ नुकताच संपला यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी त्यांना लिहेलेल्या तीन पानी पत्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या. (Prime Minister Narendra Modi compared Venkaiah Naidu with Acharya Vinoba Bhave)

पंतप्रधान मोदींनी माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांचं राजकीय जीवन आणि राज्यसभेच्या सभापतीपदी केलेल्या कामाची प्रशंसा केली. आपल्या तीन पानी पत्रात त्यांनी नायडूंची तुलना आचार्य विनोबा भावे यांच्याशी केली. तसेच त्यांचा दृढ विश्वास, ऊर्जा, व्यापक प्रवास, राज्यसभेत पहिल्यांदा येणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहित करने आणि राज्यसभेच्या उत्पादकतेत मोठी सुधारणा केल्याप्रकरणी त्यांचं कौतूक केलं. तसेच संसदीय शिस्तीची सदस्यांना वारंवार आठवण करुन देत कामकाज चालवल्याप्रकरणी त्यांचा गौरव केला. तसेच नायडू यांच्या संविधानिक ज्ञानाचा पंतप्रधानांना स्वतःला कसा फायदा झाला हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

VinobaBhave_naidu
सल्लागार समितीत शिवसेनेला हवंय स्थान; विधानसभा अध्यक्षांना पुन्हा पत्र

पाच वर्षांसाठी उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर वैंकय्या नायडू निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी आता जगदीप धनखड यांची नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. धनखड यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. धनखड आता भारताचे १४ वे उपराष्ट्रपती बनले आहेत. नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी पूर्ण झाला होता.

वैंकय्या नायडूंना दिला निरोप

दरम्यान, निवृत्तीपूर्वी ८ ऑगस्ट रोजी वैंकय्या नायडू यांच्या सन्मानार्थ निवृत्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नायडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या शहरात जेव्हा पक्षाचे मोठे नेते येणार असायचे तेव्हा ते त्यांच्या स्वागताचे पोस्टर चिकटवायचं काम करायचे. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासह आमदार त्यानंतर मंत्री आणि पुढे पक्षाचे अध्यक्षही बनले होते. पाच वर्षांपूर्वी मोदींनी आपल्याला सांगितलं होतं की, तुमची उपराष्ट्रपतीपदासाठी निवड करण्यात आली आहे, असंही यावेळी नायडू यांनी सांगितलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com