PM Modi Egypt Visit : अमेरिकेनंतर पंतप्रधान मोदी थेट इजिप्तच्या दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील व्यापाराच्या दृष्टीने करणार चर्चा

चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी थेट इजिप्तला रवाना
PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt VisitEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या चार दिवसांपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील भारतीयांशी, उद्योजकांशी संवाद साधला. याशिवाय भारतीय अमेरिकन उद्योगपतींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी व्हाइट हाउसने स्टेट डिनरचे आयोजन केले होते. यावेळी अनेक उद्योगपती, व्यावसायिक आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते. चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर आता पंतप्रधान मोदी थेट इजिप्तला रवाना झाले आहेत.(Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यानंतर ट्विट करत म्हटलं की, 'एक खूपच खास अमेरिका दौरा संपला. भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वाढवणाऱ्या अनेक कार्यक्रमात आणि संवादात भाग घेण्याची संधी मिळाली. देशात आणि जगात येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं वातावरण तयार करण्यासाठी काम करत राहू असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर आहेत.(Latest Marathi News)

PM Modi Egypt Visit
PM Modi: 'आम्ही आव्हानांना आव्हान देतो', पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत तरुण उद्योजकांना केलं संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 6 वाजता इजिप्त दौ-यावर निघाले आहेत. संध्याकाळी 5.55 वाजता कैरो एअरपोर्टवर मोदींच स्वागत केलं जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.05 वाजता इजिप्तचे पंतप्रधांसोबत मोदींची चर्चा होईल. त्याचबरोबर रात्री 9 वाजता दोन्ही देशाच्या वरिष्ट अधिकऱ्यांसोबत चर्चा होईल. रात्री 9.30 वाजता भारतीय समुदायासोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील.(Latest Marathi News)

PM Modi Egypt Visit
PM Narendra Modi : दहशतवाद आणि कट्टरतेचा जगाला धोका - पंतप्रधान नरेंद्र मोदी

तर रात्री 10. 10 च्या दरम्यान पंतप्रधान मोदी इजिप्तच्या ग्रॅण्ड मुफ्तीसोबत आणि रात्री 11 नंतर इजिप्त वरिष्ठ नेत्यांसोहत चर्चा करणार आहेत. दोन दिवसाच्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल अल सीसी यांच्या सोबत अनके करारावर चर्चा करतील. पंतप्रधान मोदींचा हा पहिला इजिप्त दौरा आहे.(Latest Marathi News)

दोन्ही देशांमधील व्यापार वाढवा हा उद्देश या भेटीमागे असणार आहे. इजिप्त आणि भारताचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. या अगोदर 1997 ला भारताचे पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते, तर दुसरीकडे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी 2015, 2016 आणि 2023 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून भारतात आले होते.(Latest Marathi News)

PM Modi Egypt Visit
PM Narendra Modi : अमेरिकी भारतीयांमुळे संबंधात सुधारणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com