भारतीय वस्तूंचा दर्जा आणि विश्वासार्हता वाढवायला हवी- पंतप्रधान मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 4 January 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वस्तू व सेवांची गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. मोदींनी राष्ट्रीय हवामान परिषदेबरोबरच राष्ट्रीय पर्यावरणीय गुणवत्ता प्रयोगशाळेचं भूमिपूजन केलं.

पंतप्रधान मोदींनी यावेळी संवाद साधताना पुन्हा एकदा व्होकल फॉर लोकलचा नारा देत भारतीय वस्तू आतंरराष्ट्रीय बाजारात नेण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी आत्मनिर्भर भारताला उल्लेख केला. मोदींनी कोरोना लशीकरणाबाबतही भाष्य केलं. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारताला दोन कोरोना लशी मिळाल्या आहेत. मला आपल्या वैज्ञानिकांचा अभिनान आहे, असं ते म्हणाले. 

भारतीय उत्पादनांची जागतिक पातळीवर केवळ मागणी असून चालणार नाही, तर 'मेक इन इंडिया' उत्पादनांना जागतिक पातळीवर मान्यता मिळायला हवी. भारतीयांना आपल्या प्रोडक्टची क्वालिटी आणि विश्वासार्हता वाढवायला हवी. भारत ग्लोबल इनोवेशल रँकिंगमध्ये सध्या टॉप 50 देशांमध्ये आहे. इंडस्ट्री आणि संस्थांमध्ये सहयोग वाढत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. कोणतेही संशोधन वाया जात नाही. कधीना-कधी त्याचा उपयोग नक्की होतो. आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार आत्मा अमर असतो, तसेच संशोधनाबाबत आहे, असंही ते म्हणाले. 

नवा कृषी कायदा आमच्या फायद्याचा नाही, रिलायन्सने पहिल्यांदाच मांडली भूमिका

2020 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भरचा संकल्प घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. यासाठी आपल्याला नवीन परिमाणं, नवी उंची गाठावी लागेल. आपल्याला भविष्यातील वैज्ञानिक पिढी घडवायची आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी पुढाकार घ्यायला हवा. शास्त्रज्ञांनी देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आपले अनुभव त्यांना सांगावेत, असं मोदी म्हणाले.  आज आपण आत्मनिर्भर होत आहोत, पण अजूनही आपल्याला अनेक गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागलं, असंही ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi during the inaugural address at National Metrology Conclave