पंतप्रधानांकडून देशवासीयांना ईदच्या सदिच्छा; वाचा काय म्हणाले PM मोदी?

PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal

नवी दिल्ली : मुस्लिम धर्मात ईद मिलाद उन-नबी (Eid Milad-un-Nabi 2021) हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या उत्सवाचं इस्लाम धर्मात मोठं महत्त्व आहे. हा सण ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) किंवा मालविद (Mawlid) या नावानं देखील ओळखला जातो. फक्त भारतातच नाही तर जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्ताने अनेकांनी मुस्लिमधर्मीयांना सदिच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi
EDचं पुढचं टार्गेट अशोक चव्हाण? चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, मिलाद-उन-नबीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वत्र शांतता आणि समृद्धी असावी, अशा सदिच्छा. दयाळूपणा आणि बंधुत्वाचे मूल्य सदैव विजयी होवोत. ईद मुबारक!

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ईदच्या सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, पैंगबर मुहम्मद यांच्या जन्मदिनी, म्हणजेच ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या या पावन दिवशी, मी सर्व देशवासीयांना, खासकरुन मुस्लिम बंधु-भगिनींना शुभेच्छा देतो. चला, आपण सगळे पैंगबर मुहम्मद यांच्या आयुष्यामधून प्रेरणा घेऊन, समाजाच्या सुख-शांतीसाठी काम करुया.

PM Narendra Modi
पंतप्रधानांनी बुद्धांची मूर्ती ट्विट करताच, भारतीयांनी दिला 'हा' सल्ला

काय आहे हा सण?

इस्लामिक कॅलेंडरनुसार, इस्लाम धर्मातील तिसरा महिना अर्थात मिलाद उन-नबीची सुरूवात झाली आहे. याच महिन्याच्या 12 तारखेला म्हणजेच इ.स.पूर्व 571 मध्ये पैगंबर मोहम्मद यांचा जन्म झाला होता. यानिमित्त भारतीय उपखंडात मोठ्या उत्साहाने ईद-ए-मिलाद उन-नबी हा सण साजरा केला जातो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी पैगंबर मोहम्मद यांच्या आठवणी मिरवणूक (जुलूस) काढण्यात येते. ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com