
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज पंतप्रधान मोदींची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. या बैठकीदरम्यान देशातल्या कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा होणार आहे.या बैठकीदरम्यान चर्चेची सूत्रे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडे असतील. आज दुपारी बारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या कोरोना परिस्थितीसंदर्भात सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील.
आगामी काळातल्या सणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सर्व नागरिकांना कोरोना विषाणूपासून सावध राहण्याचे आवाहन केलं, तसंच कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करण्याचंही आवाहन केलं.
मोदी म्हणाले होते की, सगळ्यांनी आनंदाने आणि एकतेने सण उत्सव साजरे केले पाहिजेत. पण हे करत असतानाच कोरोना विषाणूपासून सावधही राहिलं पाहिजे. मास्क परिधान करणं, वारंवार हात धुणं तसंच इतर जे काही स्वच्छतेचे आणि खबरदारीचे उपाय आहेत, ते कऱणं आवश्यक आहे.
Web Title: Prime Minister Narendra Modi Meeting With All Cm
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..