पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथाची पूजा; पाहा व्हिडिओ

वृत्तसंस्था
Monday, 30 November 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली.

वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. वाराणसी-प्रयागराज राजमार्ग लेन 6 चे लोकार्पण करण्यासाठी मोदी वाराणसीत आले आहेत. 

पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांनी डोमारी घाट ते ललीता घाटपर्यंत बोटीने प्रवास करत काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. विश्वनाथाची पूजा केल्यानंतर मोदींनी देव दिपावली महोत्सवात भाग घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. घाटावर नेत्रदिपक रोषनाई करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi offers prayers at Kashi Vishwanath Temple in Varanasi