esakal | निवडणुकीआधी PM मोदींचं उत्तर प्रदेशला गिफ्ट
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीआधी PM मोदींचं उत्तर प्रदेशला गिफ्ट

निवडणुकीआधी PM मोदींचं उत्तर प्रदेशला गिफ्ट

sakal_logo
By
नामदेव कुंभार

PM Modi Aligarh Visit: पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाने तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. अलीगढ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या कोनशीलाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.

या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी मोदी यांच्या कामाचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत जगासमोर आदर्श झाला आहे. मोदींच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढली आहे. आतापर्यंत 1.61 कोटींना रोजगार दिला आहे.

राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाबद्दल

महान स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाज सुधारक, राजा महेंद्र प्रताप सिंह जी यांच्या स्मृती आणि सन्मानार्थ राज्य सरकारतर्फे या विद्यापीठाची स्थापना केली जात आहे. अलिगढच्या कोल जिल्ह्यातील लोढा आणि मुसेपूर करीम जारौली या गावातील 92 एकर क्षेत्रावर हे विद्यापीठ स्थापन केले जात आहे. अलीगढ विभागातील 395 महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होतील.

उत्तरप्रदेशच्या संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरबद्दल

21 फेब्रुवारी 2018 रोजी लखनऊमध्ये उत्तरप्रदेशातील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेचे उदघाटन करताना पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या स्थापनेची घोषणा केली होती. अलिगढ, आग्रा, कानपूर, चित्रकूट, झाशी आणि लखनौ - याठिकाणी एकूण 6 नोड्स मधे संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे नियोजन केले होते. यापैकी अलीगढ नोडमधील जमीन वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून, या नोडमध्ये 1245 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 19 कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचा संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर देशाला संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी आणि 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करेल.

loading image
go to top