पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशवासियांना संबोधित करणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

पंतप्रधान मोदी काय बोलणार आहेत याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यांनी स्वतः टि्वट करत याची माहिती दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (20) सायंकाळी देशाला संबोधित करणार आहेत. त्यांनी एक टि्वट करुन याची माहिती दिली असून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी अनेकवेळा देशाला संबोधित केले आहे. ते दर महिन्याला 'मन की बात' च्या माध्यमातून देशाला संबोधित करत असतात. दरम्यान, आजच्या आपल्या नियोजित संभाषणात मोदी हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सायंकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहे. तुम्ही अवश्य सामील व्हा, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

देशासाठी येणारा काळ हा सणासुदीचा आहे. त्याचबरोबर हिवाळाही सुरु होतोय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे देशातील जनतेला सण साजरा करताना सावध राहण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झाल्यापासून मोदींनी जेव्हा-जेव्हा देशाला संबोधित केले आहे. तेव्हा-तेव्हा त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

 

 

पंतप्रधान मोदी यांनी दोन आठवड्यांपूर्वी एक टि्वट करुन जन आंदोलनाची सुरुवात केली होती. त्यांनी मास्क परिधान करणे, हात धुणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले होते.  कोरोना लशीच्या तयारीबाबत देशाने कुठंपर्यंत आघाडी घेतली आहे, याची माहिती देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi will be sharing a message for citizens at 6 PM today

Tags
टॉपिकस
Topic Tags: