PM मोदींनी 4 भाषांमध्ये ट्विट करत मकर संक्रांती, पोंगलच्या दिल्या शुभेच्छा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 14 January 2021

आज देशभरात मकर संक्रांती आणि पोंगलचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

नवी दिल्ली- आज देशभरात मकर संक्रांती आणि पोंगलचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन चार भाषांमध्ये उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान मोदी यांनी हिंदीमध्ये लिहिलंय की, देशाच्या जनतेला मकर संक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा. माझी कामना आहे की उत्तरायण सूर्यदेव तुमच्या सगळ्यांच्या जीवनात नवी उर्जा आणि उत्साह घेऊन येईल. 

मोदींनी इंग्रजी भाषेतील ट्विटमध्ये म्हटलंय की, मकर संक्रांतीचा उत्सव देशातील अनेक भागात साजरा केला जात आहे. हा शुभ उत्सव भारताची विविधता आणि परंपरेची जीवंतता दाखवतो. तसेच निसर्गाचे महत्त्वही हा सण दर्शवतो. मोदींनी गुजरातच्या लोकांनाही उत्तरायणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान मोदींनी पोंगल सणाच्या शुभेच्या दिल्या

मोदी म्हणाले की, पोंगल उत्सव तमिळ संस्कृतीची सर्वश्रेष्ठ झलक प्रस्तुत करतो. हा सण आपल्याला प्रकृतीसोबत जगण्याची प्रेरणा देतो, तसेच आपल्यात करुणा आणि दया भाव मजबूत करतो. सर्वांना पोंगलच्या शुभेच्या. खासकरुन माझ्या तमिळ बंधू-बघिनींना. आपल्याया चांगले आरोग्य आणि यशस्वीपणाचा आशीर्वाद मिळो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prime minister narendra modi wises indian for makar sankranti and pongal