मोदींची पहिली पत्रकार परिषद: पाच वर्षात भरीव कामे केली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मे 2019

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आज (ता.17) भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाचे आभार मानले तर पाच वर्षात देशात अनेक भरीव कामे केली असल्याचेही सांगितले.

नवी दिल्ली: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आज (ता.17) भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाचे आभार मानले तर पाच वर्षात देशात अनेक भरीव कामे केली असल्याचेही सांगितले.    

पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात दुसऱ्यांदा संपूर्ण बहुमत असलेले भाजपचे सरकार सत्तेत येणार असून भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपल्याच देशात जगाला प्रभावित करता येईल अशा अनेक गोष्टी असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेतही मोदींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले, असल्याचे दिसून आले.

दरम्यान, नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा बोलत होते. यावेळी अमित शहा म्हणाले की, सर्वांत जास्त मेहनत असणारी निवडणूक अभियान यंदा पार पडले. भाजप संघटनात्मक आधारावर काम करत आहे. 2014 मध्ये झालेला ऐतिहासिक विजय जनतेमुळे होऊ शकला. पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले. या पाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी 133 योजना आणल्या. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब, जनतेसाठी प्रयत्न केले. या योजनेचे देशात मोठे योगदान आहे. या निवडणूक कार्यक्रमात 142 सभा, 4 रोड शो घेण्यात आले होत. एक कोटी 50 लाख लोकांसोबत मोदींनी थेट संपर्क साधला, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modis First Ever Press Conference