शेतकऱ्यांबाबत मोदी सरकारचे धोरण फसवे, दुफळी निर्माण करणारे : पृथ्वीराज चव्हाण

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 24 December 2020

शेतकरी दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी उघड्यावर, कडाक्‍याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यावर आमदार चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

सातारा : जमीन अधिग्रहण कायदा असो, की किमान हमीभाव अथवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट योजना असो मोदी सरकारचे शेतकऱ्यांबाबचे धोरण नेहमीच अप्रामाणिक, फसवे आणि दुफळी निर्माण करणारे राहिले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शेतकरी दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी उघड्यावर, कडाक्‍याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. यावरून श्री. चव्हाण यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. 

श्री. चव्हाण यांनी म्हटले, की देशाला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि अन्नसुरक्षा प्रदान करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा मी ऋणी आहे. दुर्दैवाने शेतकरी दिनादिवशीच राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी उघड्यावर, कडाक्‍याच्या थंडीत आंदोलन करत आहेत.

हरपल आपके साथ! एलआयसी देणार मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूल बस

अगदी सुरुवातीपासूनच मग ते जमीन अधिग्रहण कायदा असो किंवा किमान हमीभाव अथवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट योजना असो मोदी सरकारचे शेतकऱ्यांबाबतीत धोरण नेहमीच अप्रामाणिक, फसवे आणि दुफळी निर्माण करणारे राहिल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj Chavan Tweets Modi Governmet Been Deceitful, Divisive And Dishonest Towards Farmers Satara News