esakal | Loksabha 2019 : काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chaturvedi quits Congress and joins ShivSena

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून, शिवसेनेच्या प्रचारासाठी काम करणार आहे.

Loksabha 2019 : काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबईः काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवार) दुपारी शिवसेनेत प्रवेश केला.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, 'शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून, शिवसेनेच्या प्रचारासाठी काम करणार आहे. काँग्रेसमध्ये महिलांच्या बाबतीत गैरवर्तनवर मी आवाज उठविला. त्या लोकांना पक्षाबाहेरही काढण्यात आले. पण, या मुद्द्याकडे आणखी गांभीर्याने काँग्रेसने बघण्याची गरज होती. महिला सुरक्षेवर मी नेहमीच काम करण्याचा प्रयत्न केला आहे. हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो.'

'ट्विटरच्या माध्यमातून राजीनामा जड अंत:करणानं हा निर्णय आपण घेतला आहे. दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला होता. सर्वसमावेशक, मुक्त व पुरोगामी अशा काँग्रेसच्या आदर्शांवर माझा विश्वास होता. पक्षाची सेवा करताना मला, माझ्या कुटुंबीयांना व मुलांना किती धमक्या आल्या, किती शिवीगाळ झाली याची तुम्हाला आठवण करून द्यायला नकोच. माझ्या आकांक्षाना काँग्रेस पक्ष योग्य वाव देईल. या अपेक्षेमुळे मी कधीही काही मागितलं नाही. परंतु त्यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीची दखल पक्षानं घेतली नाही. मला खेद वाटतो की काँग्रेस पक्ष महिलांची सुरक्षा, सन्मान व सबलीकरणाला प्राधान्य देतो, परंतु ते कृतीत मात्र दिसले नाही. पक्षाचं काम करत असताना काही ज्येष्ठ नेते अत्यंत असभ्यपणे माझ्याशी वागले. परंतु त्यांच्या या अक्षम्य दुर्वतनाकडे निवडणुकीची गरज म्हणून दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत वाटते. त्यामुळे आता मला काँग्रेसच्या पलीकडे बघण्याची गरज आहे. संपूर्ण देश तीन दिवस माझ्या मागे असून, मी प्रत्येकापोटी कृतज्ञ आहे.' असेही प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळीच काँग्रेसला मोठा झटका बसला असून, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आज राजीनामा पाठवला आहे. काँग्रेसच्या मीडियाच्या सगळ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमधून चतुर्वेदी बाहेर पडल्या आहेत. शिवाय, त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील काँग्रेसचे पददेखील हटवले आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्‌विटरवरून म्हटले की, 'महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिले जात आहे. मी पक्षासाठी टीकेचा सामना केला. दगड झेलले. मात्र, तरीही उलट पक्षाच्या नेत्यांनीच मला धमक्‍या दिल्या. जे लोक धमक्‍या देत होते, ते वाचले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. काही माणसं मेहनत करुन पक्षात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र, त्यांच्याऐवजी महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या मंडळींना पक्षात प्राधान्य दिलं जाते.' या संदर्भातले एक पत्रदेखील त्यांनी रिट्‌विट केले आहे.

loading image
go to top