Uttar Pradesh election | उन्नाव पीडितेच्या आईला तिकीट, काँग्रेसची पहिली यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul priyanka sonia

उन्नाव पीडितेच्या आईला तिकीट, काँग्रेसची पहिली यादी जाहीर

देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. काँग्रेस प्रभारी प्रियंका गांधी यांनी यादी जाहीर केली असून यामध्ये 50 महिलांना संधी देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित यादीत उन्नावमध्ये बलात्कार पीडित तरुणीच्या आईला देखील तिकीट देण्यात आलं आहे. (Congress First list of UP candidate)

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली लिस्ट जारी केली. या लिस्टमध्ये 125 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. त्यात 50 महिला उमेदवार आहेत. प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये फक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नाहीत. तर उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईही काँग्रेसने उमेदवारीची संधी दिली आहे.

मोठ्या नावांबद्दल बोलायचं झालं तर सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांना तिकीट मिळाले आहे. सदफ जाफर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. उन्नावमधून काँग्रेसने आशा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मुलीवर अत्याचार झाले होते. यानंतर उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. याशिवाय NRC-CAA विरोधात आंदोलन करणाऱ्या सदफ जाफर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पूनम पांडे यांनाही तिकीट मिळाले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top