Himachal Congress Victory: प्रियंका गांधींनी एक दिवस आधीच दिलं आईला बड्डे गिफ्ट, ठरल्या विजयाच्या शिल्पकार

1985 पासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलते
Himachal Congress Victory
Himachal Congress VictoryEsakal

1985 पासून हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सरकार बदलते. आता हाच कल यंदाही कायम राहिला आहे. काँग्रेसने आपला पाय हिमाचल प्रदेशमध्ये रोवला आहे. यामध्ये महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे प्रियंका गांधी आणि पक्षाचे. एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेत होते. त्याचबरोबर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आजारी होत्या त्यामुळे त्याही या निवडणुकीसाठी प्रचार किंवा सभा घेऊ शकल्या नाहीत. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची सर्व धुरा प्रियंका गांधी यांनी सांभाळली आहे.

दरम्यान आज हिमाचल प्रदेशचा निकाल लागला. काँग्रेसने ही हिमाचल प्रदेशमध्ये मजल मारली आहे. तसेच उद्या सोनिया गांधी यांचा वाढदिवस आहे. सोनिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हे मोठं गिफ्ट भेटलं असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. आजच हिमाचलमध्ये सत्तापालट आणि उद्या सोनिया गांधी यांचा वाढदिवस हे सर्व जुळून आले आहे.

तर सोनिया गांधी यांचा वाढदिवस उद्या 9 डिसेंबर रोजी रणथंबोर येथे राहुल गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासरा, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासोबत साजरा करणार आहेत.

Himachal Congress Victory
Himachal Election : हिमाचलच्या 'कांगडा'मध्ये 9 जागा जिंकणाऱ्या पक्षानं बनवली 'सरकार'; जाणून घ्या कारण

9 डिसेंबर हा सोनिया गांधींचा 76 वा वाढदिवस आहे. सोनिया आपला वाढदिवस रणथंबोरमध्ये साजरा करणार आहेत. आज रणथंबोर रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू आहे. हिमाचल प्रदेश-गुजरात विधानसभा निवडणुकांच्या सरदारशहर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर, संपूर्ण गांधी कुटुंब एक दिवस, एकाच ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतही या काळात चर्चा होऊ शकते.

Himachal Congress Victory
Himachal Election Results : हिमाचल 'त्रिशंकू' झालं तर काय, कोणाचं सरकार स्थापन होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com