Israel-Hamas War: भारतातील मुलं जल्लोष करतायत अन् तिकडे गाझामध्ये.... इस्राइल-हमास युद्धाबाबत काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

Priyanka Gandhi New Year Wish: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात गाझा पट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे भग्नावशेष झाले आणि हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarEsakal

Priyanka Gandhi New Year Wish: 2023 च्या शेवटच्या दिवशी देशभरातील लोकांनी नवीन वर्ष 2024 चे स्वागत केले. यावेळी एकमेकांना अभिनंदनाचे संदेशही दिले जात आहेत. जगभरात नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे. जगभरात नववर्षाचा आंनद साजरा करत असतानाच एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पण, त्यांच्या संदेशात इस्राइल-हमास युद्धात गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला आहे.

त्यांना याबाबतची एक्सवर(पुर्वीचे ट्विटर) पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटलं आहे की, ज्याप्रमाणे आपण नवीन वर्षाच स्वागत करत आहे. एकमेंकांना शुभेच्छा देत आहोत, आपल्या जीवनात प्रेम, शांतता, सुख आणि आंनद येवो यासाठी प्रार्थना करत आहोत, त्याचप्रमाणे आपण आज गाझा मधील आपल्या बांधवांसाठी प्रार्थना करूयात. ज्यांना त्यांच्या जगण्याच्या हक्कावर, सन्मानावर आणि स्वातंत्र्यावर सर्वात अन्यायकारक आणि अमानवी हल्ल्याचा सामना करावा लागत आहे.

Israel-Hamas War
E-commerce Policy: मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?

प्रियंका गांधी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “एकीकडे आमची मुले आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या मुलांची निर्घृण हत्या केली जात आहे. जगातील तथाकथित नेते हे मूकपणे बघत राहतात आणि सत्तेच्या लालसेच्या शोधात निष्काळजीपणे पुढे सरसावतात. मग असे लाखो लोक आहेत जे गाझामध्ये होत असलेल्या भयंकर हिंसाचाराचा अंत करण्याच्या मागणीसाठी आवाज उठवत आहेत आणि ती लाखो शूर हृदये आपल्याला एका नवीन उद्याची आशा देतात. त्यांच्यापैकी एक व्हा.”

Israel-Hamas War
'...त्यांनाच फक्त बोलावण्यात आलंय'; राम मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

विशेष म्हणजे प्रियंका गांधी इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत आवाज उठवत आहेत आणि गाझावरील हल्ल्यांबाबत सातत्याने युद्धविरामाची मागणी करत आहेत. त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये एकीकडे लोक नवीन वर्ष साजरे करत आहेत आणि फटाके फोडले जात आहेत, तर दुसरीकडे गाझामध्ये अवशेष आणि स्फोट दाखवले आहेत.

Israel-Hamas War
ISRO XPoSat Launch : नववर्षाची धमाक्यात सुरुवात! 'एक्सपोसॅट' मोहिमेचं यशस्वी उड्डाण; पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com