Priyanka Gandhi: मतदारयादी फेरआढाव्यावर चर्चा हवी : प्रियांका गांधी
Bihar Politics: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रांनी बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेररचनेवर सरकारने संसदेत व्यापक चर्चा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. विरोधकांनी गप्प का बसावे, असा सवाल त्यांनी केला.
बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेररचना करण्याचा मुद्दा गंभीर असून त्यावर सरकारने संसदेत व्यापक चर्चा करायला हवी, अशी अपेक्षा काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनी व्यक्त केली.