Rahul Gandhi News: लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. अखेर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)
या मोठ्या घडामोडीनंतर कॉंग्रेस नेत्या आणि त्यांची बहिण प्रियांका गांधी यांनी ट्विट करत संतप्त सवाल उपस्थित केला आहे. (Priyanka Gandhi Vadra tweet after Rahul Gandhi loksabha membership canceled )
प्रियांका गांधी यांनी ट्विट करत नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी यांच्या नावाचा आणि त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाल्या आहेत प्रियांका गांधी?
नीरव मोदी घोटाळा - 14,000 कोटी
ललित मोदी घोटाळा - 425 कोटी
मेहुल चोक्सी घोटाळा - 13,500 कोटी
देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला भाजप का उतरला आहे? हे लोक चौकशीपासून का पळत आहे? यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती.
मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.