प्रियांका गांधींचे लक्ष्य २०२२ ऐवजी २०२७!

उत्तर प्रदेशात संघटना भक्कम करण्याकडे भर; आजपासून ‘प्रतिज्ञा यात्रा’
Priyanka-Gandhi
Priyanka-GandhiSaka

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत महिला केंद्रित प्रचारामुळे प्रियांका गांधी आणि काँग्रेस पक्षाची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, प्रियांकांचे प्रयत्न संघटना मजबुतीसाठी असल्याने काँग्रेसला याचा फायदा २०२७ मध्ये मिळेल, असे काँग्रेसमधूनच सांगितले जात आहे. त्यामुळे प्रियांका गांधींचे लक्ष्य २०२२ ऐवजी २०२७ ची विधानसभा असल्याचे मानले जात आहे.

Priyanka-Gandhi
Pune : नवले पूलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यु

उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी करून १०५ जागांवर उमेदवार उभे केले होते. परंतु, या आघाडीचा काँग्रेसला काहीही फायदा झाला नाही. पक्षाला केवळ अवघी ६.२५ टक्के मते मिळून जेमतेम सात जागा जिंकता आल्या होत्या. या ढासळलेल्या राजकीय ताकदीबरोबरच काँग्रेसची संघटनाही खिळखिळी झाली आहे. असे असताना, लखीमपूर खिरी प्रकरणी प्रियांका गांधींचे आंदोलन, उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतरचे राजकीयनाट्य पाठोपाठ राहुल गांधींचा दौरा यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या प्रसिद्धीने कॉंग्रेस पक्ष चर्चेत आला. त्यानंतर, ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याच्या घोषणेलाही प्रसिद्धी मिळाली.

एवढेच नव्हे तर काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बारावी उत्तीर्ण करणाऱ्या मुलींना स्मार्टफोन तर पदवी मिळविणाऱ्या मुलींना इलेक्ट्रिक स्कुटी देण्याची घोषणा करून निवडणुकीचा प्रचार महिला केंद्रित करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, याचा राजकीय फायदा घेण्यासाठी संघटनात्मक ताकद नसल्याची कबुली काँग्रेसमधूनच दिली जात आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधींच्या विश्वासू वर्तुळातील मानल्या जाणाऱ्या एका नेत्याने ही कबुली देताना, या प्रयत्नांचा फायदा आताच्या निवडणुकीत मिळणार नसला तरी संघटना वाढेल आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल, अशी सूचक टिप्पणी केली. बुथवरील ताकद वाढविण्याची गरज आहे. मात्र प्रियांका गांधी प्रत्येक बूथवर जाऊ शकत नाही, याकडेही या नेत्याने लक्ष वेधले. उद्यापासून एक नोव्हेंबरपर्यंत उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी प्रतिज्ञा यात्रा काढणार आहे.

भाजपकडून मत विभागणीचे प्रयत्न

लखीमपूर खिरी प्रकरणात काँग्रेसला मिळालेली प्रसिद्धी आणि उत्तर प्रदेशात या पक्षाची अचानक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण होणे, ही विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मतविभाजानची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील अॅन्टिइन्कम्बन्सीचा (सरकारविरोधातील जनभावनेचा) थेट लाभ प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या समाजवादी पक्षाला मिळू नये आणि या विरोधात जाणाऱ्या मतांमध्ये विभागणी व्हावी यासाठी भाजपने जाणीवपूर्वक प्रियांका गांधींना रोखण्याची आणि अटकेची खेळी करून प्रसिद्धी मिळवून दिली, असे सांगितले जाते. मात्र काँग्रेसने ही चर्चा हास्यास्पद ठरविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com