esakal | West Bengal: ममता जिंकल्या असतील पण 'मॅन ऑफ द मॅच' मीच
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Tibrewal

ममता जिंकल्या असतील पण 'मॅन ऑफ द मॅच' मीच

sakal_logo
By
सुधीर काकडे

पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांना दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा ममतांनी ५८, ८३२ मतांनी पराभव केला. विजयानंतर ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोग आणि मतदारांचे आभार मानले. तर पराभुत उमेदवार प्रियंका टिबरेवाल (Priyanka Tibrewal) यांनी मात्र या निवडणुकीत आपणच मॅन ऑफ द मॅच असल्याचे म्हटले आहे.

निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टिकास्त्र सोडलं. भाजपने सुरूवातीपासून आपल्या विरोधात कट केल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. त्यानंतर पराभूत उमेदवार टिबरेवाल यांनीही आता आपली प्रतिक्रीया दिली आहे. 'आपणच या सामन्यातील 'मॅन ऑफ द मॅच' आहोत, कारण ममता बॅनर्जींच्या गड असलेल्या मतदार संघात निवडणूक लढवली आणि 25,000 पेक्षा जास्त मते मिळवली.' असे म्हणत त्यांनी यापुढेही कठोर परिश्रम करत राहणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: विजयानंतर ममतांची तिखट प्रतिक्रीया; भाजपला लगावला टोला

भवानीपूर मतदार संघातील या निवडणुकीवर देशाचं लक्ष लागून होतं. भाजप आणि तृणमुल काँग्रेस यांच्यात मागच्या काळात झालेला संघर्ष आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार पाहता ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार अशी शक्यता होतीच. त्यातच ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री राहता येणार की नाही, हे देखील या निवडणुकीवर ठरणार होते, त्यामुळे पश्चिम बंगाल आणि देशाच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्वाची होती.

loading image
go to top