वयाबरोबर वाढले दृष्टीदोषही;मधुमेहाचे वाढते प्रमाण कारणीभूत

वयाबरोबर वाढले दृष्टीदोषही;मधुमेहाचे वाढते प्रमाण कारणीभूत

नवी दिल्ली - भारतातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढले असल्याचे विविध अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय अहवालातही ही बाब मान्य करण्यात आली आहे. मात्र, देशात मधुमेहाचे प्रमाणही वाढत असल्याने त्याचा थेट परीणाम डोळ्यांच्या क्षमतेवर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतीयांचे आयुर्मान वाढत असले तरी नजर कमजोर होत असून अंधत्वाच्या समस्येत वाढ झाल्याचे दोन आंतरराष्ट्रीय अहवालांत म्हटले आहे. 

व्हीजन लॉस एक्स्पर्ट ग्रुप (व्हीएलजीई) आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ ब्लाइंडनेस (आयएपीबी) या दोन संस्थांनी इतर काही संस्थांनी गोळा केलेल्या माहितीच्या मदतीने जगभरातील अंधत्व वाढीबाबत अभ्यास करून अद्ययावत माहिती अहवाल प्रसिद्ध केला आहे. या माहितीनुसार, भारतात १९९० मध्ये दूरदृष्टीता हा दोष असणाऱ्या लोकांची संख्या ५.७७ कोटी इतकी होती. २०२० मध्ये अशा लोकांची संख्या वाढून ती १३.७६ कोटी झाली आहे. या अहवालात गेल्या तीन दशकांत झालेले बदल आणि पुढील तीस वर्षांत होणाऱ्या बदलांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भविष्यात लोकांना येऊ शकणाऱ्या अंधत्वापासून बचावासाठी आतापासूनच प्रयत्न करण्यासाठी ही आकडेवारी आणि माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. जवळचे नीट दिसू शकण्याचे प्रमाण वाढत असून चाळीशी नंतर नजर कमजोर होण्याचा असलेला धोका वाढला असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, भारतात दर सहा मधुमेही व्यक्तींपैकी एकाला दृष्टीदोष आहे. 

नजर अंधुक होण्याचे प्रमाण 
१९९० : ४.०६ कोटी 
२०२० : ७.९० कोटी 

दूरदृष्टीता दोष असणे 
१९९० : ५.७७ कोटी 
२०२० : १३.७६ कोटी 

दृष्टीहिनांची संख्या 
१९९० : ७० लाख 
२०२० : ९२ लाख 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहवालातील इतर मुद्दे 
- मधुमेह हे दृष्टीदोषाचे प्रमुख कारण 
- उच्च कॅलरी असलेले अन्न खाणे, आरामदायी जीवनशैली मधुमेहाला आणि पर्यायाने दृष्टीदोषाला कारणीभूत 
- जगातील ७८ टक्के दृष्टीहिनांचे वय ५० च्या पुढे 
- भारतात ०.३६ टक्के लोकसंख्या दृष्टीहिन आहे 
- अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नजरेत दोष 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com