

madhya pradesh gandhisagar cheetah
sakal
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात प्रोजेक्ट चित्त्याचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रविवारी (२० सप्टेंबर) बोत्सवानातून भारतात आणलेल्या मादी चित्ता CCB-2ला गांधीसागरमधील सॉफ्ट-रिलीज एन्क्लोजरमध्ये सोडले. यावेळी तिचे ‘राधा’ असे नामकरण करण्यात आले. राधाष्टमीनिमित्त हे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात आले.