विवाहितेला लग्नाचं वचन देवून शारिरीक संबंध बलात्कार नाही...; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Kerala HC

विवाहितेला लग्नाचं वचन देवून शारिरीक संबंध बलात्कार नाही...; HC चे महत्त्वपूर्ण निरीक्षण

मद्रास - केरळ उच्च न्यायालयाने अलीकडेच एका २५ वर्षीय पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा खटला रद्द करताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. तसेच आधीच विवाहित असलेल्या महिलेला लग्न करण्याचे पुरुषाने दिलेले आश्वासन भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६ अन्वये बलात्काराच्या तरतुदीत बसत नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ( Kerala HC news in Marathi)

न्यायमूर्ती कौसर एडप्पागाथ यांच्या खंडपीठाने 22 नोव्हेंबर रोजी कोल्लममधील पुनालूर येथील रहिवासी 25 वर्षीय टिनो थानकाचन यांच्याविरोधात आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार), 417 (फसवणूक) आणि 493 (लैगिक संबंधांसाठी फसवे प्रलोभन) अंतर्गत दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा रद्द करताना हे निरीक्षण नोंदवले.

हेही वाचा: Baba Ramdev : महिलांवरील टिप्पणी रामदेव बाबांना भोवणार? महिला आयोगाने घेतली दखल

थांकाचन यांनी लग्नाचे खोटे आश्वासन देवून विवाहित परंतु पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, पीडितेने स्वेच्छेने आपल्या प्रियकरासोबत लैंगिक संबंध ठेवले होते. 'तिला हे चांगलंच माहीत होतं की, ती विवाहित स्त्री असून याचिकाकर्त्याशी कायदेशीर विवाह करू शकत नाही.

दरम्यान आरोपीने एका विवाहित महिलेला आपण तिच्याशी लग्न करू शकतो असे वचन दिले. मात्र ते एक वचन आहे, जे कायद्यात अंमलात आणण्यायोग्य नाही. आयपीसीच्या कलम ३७६ अन्वये असे अंमलात न येणारे आणि बेकायदेशीर आश्वासन खटला चालविण्यासाठी आधार असू शकत नाही. येथे, लग्न करण्याच्या वचनाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण पीडित महिला एक विवाहित स्त्री आहे आणि तिला माहित आहे की याचिकाकर्त्याशी विवाह कायद्यानुसार शक्य नाही. म्हणूनच, आयपीसीच्या कलम 376 मधील मूलभूत घटकाची हे जुळत नाहीत. तसेच आयपीसीच्या कलम ४१७ आणि ४९३ मधील घटकांना योग्य ठरेल, असं काहीही रेकॉर्डवरही नाही. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा सिद्ध होत नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: ST Employee : एसटी कर्मचारी महागाई भत्याच्या मागील फरकापासून वंचित

दरम्यान लैंगिक संबंध सहमतीने होते हे आधीच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे, असेही कोर्टाने नमूद केले. याचिकाकर्त्याने दिलेल्या विवाहाच्या आश्वासनाने महिलेने लैंगिक संबंधासाठी संमती दिली. 'हे निश्चित झाले आहे. जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न करण्याचे आपले वचन मागे घेतले, तर त्यांनी संमतीने केलेले लैंगिक संबंध हा आयपीसीच्या कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा ठरत नाही,

आरोपी आणि पीडित तरुणीची ऑस्ट्रेलियात फेसबुकच्या माध्यमातून भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी लग्नही करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्न झाले नाही. याचिकेत प्रतिवादी म्हणून सूचीबद्ध असलेल्या महिलेच्या म्हणण्यानुसार, याचिकाकर्त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानेच आपण लैंगिक संबंध ठेवण्यास होकार दिला होता.

टॅग्स :high courtCourt