T Raja Singh : मुंडकं छाटायला मी काही जनावर नाही; निलंबित भाजप आमदाराची संतप्त प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA T Raja Singh

तेलंगणा पोलिसांनी मंगळवारी टी. राजा यांना अटक केली होती.

मुंडकं छाटायला मी काही जनावर नाही; निलंबित भाजप आमदाराची संतप्त प्रतिक्रिया

Prophet Muhammad Row : इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad Paigambar) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हैदराबादमधील (Hyderabad) आमदार टी. राजा सिंह (MLA T Raja Singh) यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यांना तात्काळ सोडण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते. त्यानंतर पोलिसांकडून टी. राजा यांना सोडून देण्यात आलं.

तेलंगणा पोलिसांनी (Telangana Police) मंगळवारी टी. राजा यांना अटक केली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षानं त्यांना निलंबित केलं. यासोबतच त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, अशी विचारणा करत पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. दरम्यान, आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार टी राजा सिंह यांनी एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. तुरुंगात जाण्याची भीती बाळगत नाही, असं या व्हिडिओत सिंह यांनी म्हटलंय.

मुंडकं छाटायला मी काही प्राणी नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील धमक्यांवर त्यांनी दिलीय. माझा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी का अटक केली नाही? असा सवालही सिंह यांनी केलाय. 23 ऑगस्टला सिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या सिंह यांना काल पुन्हा अटक करण्यात आलीय. अटकेपूर्वीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

टॅग्स :TelanganaHyderabad