Prophet Remark Row : बंगालमध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक, अनेक जण जखमी

prophet row protesters attack damage local train in bengal nadia district police
prophet row protesters attack damage local train in bengal nadia district police

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील बेथुआडहरी रेल्वे स्थानकावर रविवारी संध्याकाळी लोकल ट्रेनवर एका गटाने हल्ला केला. या हल्ल्यात ट्रेनचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (prophet row protesters attack damage local train in bengal nadia district police)

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत होता पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एकलव्य चक्रवर्ती यांनी सांगितले की, लोकांच्या अनियंत्रित जमावाने ट्रेनवर दगडफेक केली. यात काही लोक जखमी झाले. तेथे सध्या एकही ट्रेन सुरू नाहीये, आम्ही राज्य सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत, असे त्यांनी सांगितले.

मोठ्या संख्येने आंदोलकांनी रस्ता अडवला आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला तेव्हा त्यांच्यापैकी काहींनी स्टेशनमध्ये प्रवेश केला आणि प्लॅटफॉर्मवरून निघालेल्या ट्रेनवर दगडफेक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. हल्ल्यामुळे लालगोला मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या माजी प्रवक्त्यांच्या विधानानंतर शुक्रवारी हिंसाचार उसळल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला . झारखंड पोलिसांचे म्हणणे आहे की, रांचीमधील संवेदनशील भागात पाळत ठेवण्यासाठी 3500 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालमधील हावडा आणि मुर्शिदाबादमध्ये आतापर्यंत 100 जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी बहुतांश भागात इंटरनेट सेवा बंद राहिली.

रांचीमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मारले गेलेले मोहम्मद मुदस्सीर कैफी आणि मोहम्मद साहिल यांच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, ते आंदोलनात सहभागी नव्हते. साहिलचा भाऊ साकिब अन्सारी याने सांगितले की, त्याचा भाऊ शुक्रवारच्या नमाजानंतर काही कामासाठी रांचीच्या मुख्य रस्त्यावर गेला होता, तिथे त्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. कैफीचे वडील अफजल यांनी सांगितले की, त्यांच्या अल्पवयीन मुलाला गोळ्या कशा लागल्या हे मला माहीत नाही कारण तो निषेधात सहभागी नव्हता. रिम्सचे पीआरओ डीके सिन्हा म्हणाले की, हॉस्पिटलच्या रेकॉर्डनुसार कैफीचे वय 22 आणि साहिलचे 24 आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 13 गंभीर जखमींवरही रिम्समध्येच उपचार सुरू आहेत.

बंगालमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च

पोलिसांनी शनिवारी रात्री हावडामधील उलुबेरिया, पांचाला, जगतबल्लवपूर आणि धुलागढमध्ये मोर्चा काढला आणि संवेदनशील भागात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दोन्ही जिल्ह्यांतून हिंसाचाराची कोणतीही नवीन घटना घडली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोलकाता येथील पार्क सर्कस, किदरपूर, राजाबाजार आणि मल्लिकबाजार येथेही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com