Propose Day 2023: प्रपोज डे ला प्रेम व्यक्त करण्यासाठी 'या' गोष्टी करा...

आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही.
Propose Day
Propose DayEsakal

Propose Day: व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस 'प्रपोज डे' म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की, 1477 मध्ये ऑस्ट्रियन आर्कड्यूक मॅक्सिमिलियनने मेरी ऑफ बरगंडीपुढे लग्नासाठी प्रस्ताव मांडला होता. हा पहिला प्रस्ताव मानला जातो. त्यानंतरच हा खास दिवस प्रचलित झाला. काही ठिकाणी असे देखील म्हटले जाते की, 1816 मध्ये या दिवशी राजकुमारी शार्लोटने तिच्या भावी पतीला प्रपोज केले होते. तेव्हापासून प्रपोज डे साजरा केला जातो. प्रपोज डे उपक्रमाची सुरुवात या दोनपैकी कुठल्याही घटनेने झालेली असो, पण ती तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करण्याची एक उत्तम संधी देते.

Propose Day
Propose Day 2023 : प्रपोज डे स्पेशल शायरी

प्रपोज डे म्हणजे खास दिवस...आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. मग आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कशा पद्धतीनं करायचं हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मग अशा व्यक्तींसाठी काही खास मार्ग आहेत. या मार्गाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.

Propose Day
Propose Day 2023 : प्रपोज डे का साजरा केला जातो?

1) तुम्हाला काय वाटते ते त्यांना सांगण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फ्युचर प्लॅन करण्यासाठी प्रपोज डे योग्य दिवस आहे. 

2) तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी एखाद्या निसर्ग रम्य ठिकाण किंवा हॉट बलून राईडची छोटीशी ट्रीप प्लॅन करु शकता. 

3) तुम्ही एखादे पर्सनाइझ लव्ह नोट किंवा कविता गिफ्ट करु शकता. सुंदर अशा काव्यात्मक शब्दांच्या माध्यमातून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करु शकता. त्यात शायरी वा गाण्यांच्या काही ओळींचा वापर करु शकता.

4) जर तुमचा अंगठी देण्याचा विचार असेल हे परफेक्ट वेळ आहे. 

5) तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीचे आतापर्यंतचे सर्व फोटो एकत्र करुन त्याचा अल्बम करु शकता आणि तो गिफ्ट करु शकता. त्या अल्बमच्या माध्यमातून आपण आपले प्रेम व्यक्त करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com